महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये युध्दजन्य परिस्थिती   

प्रशासनाकडून मॉकड्रील यशस्वी

पुणे : पुणे महापालिकेच्या जुन्या इमातीमध्ये अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्थ होते. चार  वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या मजल्यावर स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यानंतर तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर स्फोट झाल्याचा आवाज आला. कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले नागरिक यांनी इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जमा झाले. स्फोटामुळे काहीकाळ एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून बचाव पथके दाखल झाली. या घटनेत पाच जण जखमी झाले त्यांना उचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना खरी असली तरी, आपातकालीन परिस्थितीत आपण किती सक्षम आणि सतर्क आहोत, हे दाखविण्यासाठी आयोजित प्रत्याक्षिक म्हणजेच मॉकड्रील करण्यात आले आहे.
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील घेण्यात आले. यावेळी पुणे मनपामध्ये हल्ला झाल्यास त्यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देण्यात आली. पुणे मनपाच्या इमारातीला मुख्य प्रवेशद्वारासह १३ दरवाजे आहेत. त्यातून बाहेर पडावे, तसेच नवीन इमारतीचे बेसमेंट सर्वात सुरक्षित असून, त्यामध्ये आश्रय घ्यावे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनात हा मॉकड्रील करण्यात आला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांच्यासह अग्निशमन दल, बॉम्ब शोध पथक, क्विक रिस्पॉन्स टीमचे सदस्य सहभागी झाले होते.
 

Related Articles